पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न

प्रियांका गांधी

वाहन उद्योग क्षेत्रातील भीषण परिस्थिती आणि मंदीची स्थिती या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकार आपले डोळे कधी उघडणार, असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला आहे. हिंदीतून केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली. 

सुरक्षादलांना मोठे यश; 'लष्कर' मॉड्यूल उद्ध्वस्त, ८ दहशतवाद्यांना अटक

आपल्या ट्विटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने निघाली आहे. लाखो भारतीयांच्या डोक्यावर सध्या बेरोजगारीची टांगती तलवार आहे. वाहन उद्योगातील चित्र बोलके आहे. लोकांचा बाजारावरचा विश्वास उडू लागला आहे. एवढे सगळे घडत असताना सरकार आपले डोळे कधी उघडणार, असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडून सोमवारी ताजी माहिती जाहीर करण्यात आली. यामध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१.५७ टक्क्यांची घट झाली आहे. तर प्रवासी कारच्या विक्रीमध्ये ४१.०९ टक्क्यांची घट झाली आहे. 

गूड न्यूज! राज्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी २० कोटी डॉलरचा करार

१९९७-९८ पासून या स्वरुपाची माहिती जमविण्यास सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच विक्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. ट्रक आणि बसच्या विक्रीमध्ये ३९ टक्क्यांनी तर दुचाकी गाड्यांच्या विक्रीमध्ये २२ टक्क्यांनी घट झाली आहे.