पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : ... आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बासरीवादनाने संसदीय समितीला केले थक्क!

पी. कुन्हीकृष्णन हे बंगळुरूतील यु. आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक आहेत.

अवकाशात उपग्रह पाठवणे, संशोधन करणे हे खरंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) काम पण याच संस्थेतील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ वेगळ्याच कारणामुळे सध्या इंटरनेटवर चर्चेत आले आहेत. संसदीय स्थायी समितीची औपचारिक बैठक संपल्यानंतर त्यांनी आपल्या बासरीवादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या संसदीय समितीत असलेले काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बैठकीनंतर झालेल्या बासरीवादनाचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

ठाकरेंविरोधात वादग्रस्त पोस्ट, महिला शिवसैनिकाकडून शाईफेक

पी. कुन्हीकृष्णन हे बंगळुरूतील यु. आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक आहेत. पण ते व्यावसायिक बासरीवादकही आहेत. अनेकजण त्यांच्या बासरीवादनाची प्रशंसा करतात. संसदेच्या स्थायी समितीची बैठक इस्रोच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीनंतर कुन्हीकृष्णन यांनी आपल्या बासरीवादनाने सर्वांना थक्क केले. इस्रोचे प्रमुख के सिवन हे सुद्धा उपस्थित होते. 

जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, संसदीय स्थायी समितीच्या बैठकीचा शेवट उपग्रह केंद्राचे संचालक पी. कुन्हीकृष्णन यांच्या बासरीवादनाने झाला. ते एक व्यावसायिक बासरीवादक आहेत. त्यांनी सर्वांना आवडणाऱ्या 'वटापी गणपती भजे'च्या सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.

'शपथविधीवर बहिष्कार टाकून अपशकून करायचा, हे कसले धंदे?'

त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात बघितला जातो आहे. २८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.