पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आई मुलाचा मुका घेते, त्यालाही सेक्स म्हणायचे?, जीतन राम मांझी यांचे वादग्रस्त विधान

जीतन राम मांझी

लोकसभेमध्ये भाजपच्या खासदार रमादेवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आझम खान यांच्या समर्थनार्थ उतरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी नवे वादग्रस्त ठरणारे विधान केले. आझमखान यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे जीतन राम मांझी यांनी म्हटले आहे. पण त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.

भारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली

जेव्हा बहिण आणि भाऊ भेटतात. ते एकमेकांचा मुका घेतात. त्यालाही सेक्स म्हणणार का?, आई आपल्या मुलाचा आणि मुलगा आपल्या आईचा मुका घेतो, मग हा सुद्धा सेक्स का? आझम खान यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पण राजीनामा देण्याची काहीच आवश्यकता नाही, असे जीतन राम मांझी यांनी म्हटले आहे. 

गेल्या गुरुवारी लोकसभेमध्ये रमा देवी अध्यक्षपदी विराजमान असताना आझम खान यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपच्या महिला सदस्यांनी आझम खान यांना धारेवर धरले. त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली. आझम खान यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्याचबरोबर आपण असंसदीय बोललो असू, तर राजीनामा द्यायला तयार आहोत, असा प्रतिवाद आझम खान यांनी केला. 

पवारसाहेबांनी आत्मचिंतन करण्याची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

या सर्व पार्श्वभूमीवर आझम खान यांच्या वक्तव्यावर त्यांची बाजू घेणाऱ्या जीतन राम मांझी यांनी नवे वादग्रस्त वक्तव्य केले.