पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारला पूर्वीच कळवलं होतं, हेरगिरी प्रकरणावर व्हॉट्स अ‍ॅपचं स्पष्टीकरण

हेरगिरी प्रकरणावर व्हॉट्स अ‍ॅपचं स्पष्टीकरण

व्हॉट्स अ‍ॅपच्या सुरक्षेमधील अडचणींबाबत आम्ही भारत सरकारला मे महिन्यातच सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण व्हॉट्स अ‍ॅपनं दिलं आहे. भारतीय पत्रकार आणि मानवाधिकारी कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याच्या प्रकरणात केंद्र सरकारने व्हॉटस अ‍ॅपकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर शुक्रवारी कंपनीनं स्पष्टीकरण दिलं आहे. 

शहा राहिले दूर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी फोनवर चर्चा

 इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याच्या वृत्ताला व्हॉटसअ‍ॅपनंही दुजोरा दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली. ४ नोव्हेंबर पर्यंत उत्तर द्यावे असे केंद्र सरकारने  व्हॉट्सअॅपला बजावले होते. 

मे महिन्यात आम्हाला सुरक्षेसंदर्भात काही अडचणी आढळून आल्या. आम्ही  तातडीनं भारत सरकार  आणि इतर आंतरराष्ट्रीय सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तेव्हापासून जे युजर्स अकाऊंट या हल्ल्याला बळी पडले आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत यासाठी कारणीभूत असलेल्या एनएसओ ग्रुपला जबाबदार धरण्याची मागणीही आम्ही केली होती, असंही व्हॉटसअ‍ॅपनं म्हटलं आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना पोलीस कोठडी

'युजर्सची हेरगिरी होत आहे अशा प्रकारची कोणतीही माहिती व्हॉट्स अ‍ॅपनं यापूर्वी कंपनीला दिली नव्हती. अशा प्रकारची माहिती उपलब्ध असती तर नक्कीच भारत सरकारनं  कारवाई केली असती, मात्र व्हॉट्स अ‍ॅपनं कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही', अशी माहिती 'माहिती व तंत्रज्ञान विभागातील' एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. 

धक्कादायक! गळा चिरुन पत्नीचा खून