पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेरगिरीचा फटका, व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ८०% नी घटली

व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या घटली

हेरगिरीच्या आरोपावरून सध्या वादात सापडलेल्या व्हॉट्स अ‍ॅपला  भारतात मोठा  फटका बसला आहे. भारतात सर्वाधिक युजर्स असलेल्या या अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ८०% नी घटली असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. 

पेगॅसस या इस्त्रायली स्पायवेअरचा वापर करून जगभरातील १, ४०० व्हॉट्स अ‍ॅप युजर्सची हेरगिरी  करण्यात आली. यात भारतातील १२१ पत्रकार, मानवधिकार कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. हेरगिरी करण्यात आल्याच्या वृत्ताला व्हॉट्स अ‍ॅपनंही दुजोरा दिला आहे.  या वृत्तानंतर भारतात व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची  संख्या घटली असल्याचं समोर आलं आहे.

अमानुषतेचा कळस, श्वानास गाडीला बांधून फरफटत नेले

ऑक्टोबर २६  ते नोव्हेंबर ३ दरम्यान भारतात व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ८०% नी घटली असल्याचं वृत्त बिझनेस स्टँडर्डनं  सॅन्सॉर टॉवर डाटाच्या हवाल्यानं प्रकाशित केलं आहे.  १७ ऑक्टोबर  ते २५ ऑक्टोबर या काळात व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या जवळपास ८० लाखांहून अधिक होती. मात्र २६ ऑक्टोबर ते नोव्हेंबर ३ दरम्यानच्या  काळात केवळ १० लाख लोकांनी  व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड केल्याचं सेन्सॉर टॉवर डेटाच्या अहवालातून समोर आलं आहे. 

भाजप-सेनेतील तिढ्याने संसद अधिवेशनाचा कार्यक्रम अनिश्चित

 दुसरीकडे 'सिग्नल' आणि 'टेलिग्राम' डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या भारतात वाढली असल्याचंही समोर आलं आहे. भारतात 'सिग्नल' अ‍ॅप  डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ६३ % नी आणि 'टेलिग्राम' अ‍ॅप  डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या १०% नी वाढली आहे.