पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रशांत किशोर ममतांना मदत करण्यावरून भाजपमध्ये नाराजी, जनता दलाने हात झटकले

जनता दल संयुक्तची बैठक रविवारी झाली

निवडणूक प्रचारतज्ज्ञ प्रशांत किशोर हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मदत करणार असल्याचा मुद्द्यावरून जनता दल संयुक्तने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत किशोर हे जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या व्यावसायिक गोष्टींशी पक्षाचा संबंध नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना मदत केली, त्यावेळी हे प्रश्न का विचारण्यात आला नाही, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 

आम्ही पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा वापर करत नाही : PM मोदी

प. बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत तेथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भाजपशी जोरदार टक्कर द्यावी लागणार हे स्पष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची कोलकातामध्ये भेट घेतली होती. प्रशांत किशोर या निवडणुकीत रणनिती ठरविण्यासाठी ममता बॅनर्जी यांना मदत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर विरोधी आघाडीतील घटक पक्षाला कशी काय मदत करू शकतात, असा प्रश्न जनता दलाच्या नेत्यांना विचारण्यात येऊ लागला. 

पक्षाची भूमिका मांडताना के सी त्यागी म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव व्हावा, अशीच आमच्या पक्षाची इच्छा आहे. पण प्रशांत किशोर यांच्या व्यवसायाशी जनता दलाचा काहीही संबंध नाही. त्यांनी जेव्हा जगनमोहन रेड्डी यांना मदत केली त्यावेळी कोणी असे प्रश्न विचारले नाही. प्रशांत किशोर यांना पक्षाने जे काम दिले आहे. ते काम ते व्यवस्थितपणे करीत आहेत.

RSS ची विचारधारा देशासाठी घातकः शरद पवार

प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांना मदत करणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर जनता दलाचा सहयोगी पक्ष भाजपने नाराजी व्यक्त केली. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये लक्ष घालू नये, असे भाजपला वाटते आहे.