पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक प्रसारमाध्यमातही मोदींची चर्चा, 'वो है तो मुमकिन है!'

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यंदाच्या लोकसभेत प्रचंड बहुमतांनी विजय नोंदवला. विक्रमी विजयाने त्यांनी केवळ विरोधकांनाच धक्का दिला नाही. तर  सीमेपलिकडील पाकिस्तानलाही आपला सूर बदलायला लावला आहे. भारतीय जनतेन मोदींना विराट मताधिक्याने एकहाती सत्ता दिल्यानंतर पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमातही आता मोदींची चर्चा सुरु आहे. मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्याचे पाकिस्तानकडून समर्थन करण्यात येत आहे.  

पाकिस्तान प्रसार माध्यमातील एका वर्गात मोदींच्या विजयात राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरला असा सूर पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने मोदींना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले असून त्यांच्या विजयात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

हा गोडसेंच्या विचारांचा विजय, पराभवानंतर दिग्गीराजांची प्रतिक्रिया

त्यांनी आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या निर्णयामुळे मोदींनी विरोधकांना पिछाडीवर टाकले. पुलवामा येथील जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील वातावरण हे तणावपूर्ण आहे. पाकिस्तानात असलेल्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने हा हल्ला घडवून आणला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळे उद्वस्त केली होती.   

'द न्यूज इंटरनेशनल' मध्ये ऐजाज जका सय्यद यांनी लिहले आहे की,  'भाजपा आणि मोदी यांनी लोकसभा निवडणूका जिंकल्या आहेत. ते या विजयाचे हकदार आहेत. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांना विजयाची भूक होती. मोदींनी काही चुका नक्कीच केल्या असतील, मात्र विरोधकांना त्या दाखवून देता आल्या नाहीत, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. 

मोदी सरकारकडून १६ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस