पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बांगलादेशमधील स्थलांतरित इन्फोसिसचा CEO झालेला बघायला मला आवडेल'

सत्या नाडेला

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या कायद्यावरून दोन मतप्रवाह आहेत. आता विविध क्षेत्रातील दिग्गज या कायद्यासंदर्भात आपली मते मांडू लागले आहेत. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नाडेला यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त केले. सुधारित नागरिकत्व कायदा आणि त्यावरून देशात जे काही सुरू आहे ते अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'बझफीड न्यूज'चे संपादक बेन स्मिथ यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी सत्या नाडेला यांचे मत मांडले आहे.

'अरे! ये गँग तो बनने से पहले ही टुकडे टुकडे हो गया...'

बेन स्मिथ यांच्या ट्विटनुसार, सत्या नाडेला यांनी म्हटले आहे की, सध्या जे काही घडते आहे ते अत्यंत वाईट आहे. बांगलादेशमधून भारतात आलेला स्थलांतरित इथे येऊन इन्फोसिस कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झालेला बघायला मला आवडेल, असे सत्या नाडेला यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

सुधारित नागरिकत्व विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर झाले. त्यानंतर याच महिन्यात या कायद्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. या सुधारित कायद्यानुसार भारताच्या शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन आलेल्या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. केवळ डिसेंबर २०१४ पूर्वी आलेल्या नागरिकांना अर्ज केल्यानंतर अशा पद्धतीने नागरिकत्व दिले जाऊ शकते.