पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भविष्यात अण्वस्त्रांचा वापर त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून, राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य

राजनाथ सिंह

अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करायचा नाही, याबद्दल आम्ही आजही कटिबद्ध आहोत. पण भविष्यात काय घडेल, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असे सूचक वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केले. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त राजनाथ सिंह शुक्रवारी पोखरणला गेले होते. 

स्वातंत्र्य दिनी मोदींनी केलेल्या ३ घोषणांचे चिंदबरम यांनी केले कौतुक!

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने केलेली अणूचाचणी हे देश अण्वस्त्र वापरासाठी सज्ज असल्याचे प्रतिक होते. पण त्याचवेळी अण्वस्त्रांचा पहिला वापर भारत करणार नाही, यावर ते ठाम होते. आम्ही आजही त्यांनी घालून दिलेले तत्त्व पाळतो. पण भविष्यात काय होईल. हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांचे गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले होते.