पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'J&k च्या राज्यपालांना मद्यपान अन् गोल्फ खेळण्याशिवाय काही काम नसते'

सत्यपाल मलिक

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीर आणि त्याठिकाणच्या राज्यपालांसदर्भात खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यपालांना काही काम नसते. काश्मीरमध्ये जो राज्यपाल असतो त्याच्याकडे तर मद्यपान करणे आणि गोल्फ खेळणे याशिवाय कोणतेही काम नसते, असे वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केले आहे. बागपत येथील हिसावदा या गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील आपल्या भाषणात त्यांनी हे खळबळजन विधान केले.  

COVID-19: जगभरात ६ हजारांहून अधिक लोकांनी गमावला जीव

एएनआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअरकेला आहे. या व्हिडिओमध्य सत्यपाल मलिक म्हणतात की, राज्यपालांना काही काम नसते. काश्मीरमध्ये जो राज्यपाल असतो तो मद्यपान करणे आणि गोल्फ खेळणे याशिवाय काहीच करत नाही. इतर ठिकाणचे राज्यपाल एकदर आरामत असतात. कोणत्याही वादात ते पडत नाहीत.  ज्यावेळी मला बिहारला पाठवण्यात आले त्यावेळी मी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला. त्याठिकाणी जी ११० महाविद्यालये होती ती सर्व राजकीय नेत्यांची होती. एकाही महाविद्यालयता शिक्षक नव्हता. बीएडच्या प्रवेशासाठी ३० लाख रुपये घेऊन प्रवेश दिला जात. थेट परीक्षा घेऊन पदवी दिली जायची. त्याठिकाणची पंरपरा मोडीत काढून योग्य यंत्रणा सुरु केली, असेही त्यांनी सांगितले.  

कमलनाथ सरकारच्या बहुमत चाचणीसंदर्भात संभ्रम!

जम्मू काश्मीसंदर्भात ते म्हणाले की, कलम ३७० रद्द करणे कठीण काम होते. केंद्राने ते करुन दाखवले. तेथील जनता  सुरक्षित झाली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर शेजारील देश बिथरला आहे, असे म्हणत त्यांनी पाकलाही टोमणा लगावला. आपली कृत्ये थांबवली नाहीत तर त्यांना पाकव्याप्त काश्मीरही गमवावे लागेल, असा उल्लेखही सत्यपाल यांनी यावेळी केला.