पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून दिल्लीत भाजपने मुस्लिम समाजातील एकालाही उमेदवारी दिली नाही

मनोज तिवारी

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच आठवड्यात दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाची बाजू मांडली. 

बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार?; उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावेळी एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही. १९९३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत भाजपने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल खुलासा करताना मनोज तिवारी म्हणाले, जरी आम्ही त्यांच्यातील (मुस्लिम समाजातील) प्रतिनिधींना उमेदवारी दिली तरी ते (मुस्लिम) कधीही आम्हाला जिंकण्यासाठी मदत करीत नाहीत. केंद्र सरकारमध्ये आमच्याकडे मुस्लिम समाजातील व्यक्ती मंत्रिपदावर आहे. पण त्या समाजातील लोकांना आम्हाला राज्यसभेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व द्यावे लागते. राज्यांमध्ये यासाठी विधान परिषदेचा वापर करावा लागतो. आतापर्यंत आम्ही खूप वेळा त्यांना तिकीट दिले. पण त्यांनी कधीही आम्हाला जिंकण्यासाठी मदत केली नाही, असे त्यांनी सांगितले.

घाबरू नका, Income Tax च्या नव्या पर्यायातही ५० वजावटी उपलब्ध

भाजप कधीही हिंसाचाराचे समर्थन करीत नाही, असे सांगून मनोज तिवारी म्हणाले, शाहिन बागमध्ये 'पीएम को गोली मारो...', 'एचएम को गोली मारो...' , 'जिन्नावाली आझादी...' अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळेच आमच्या काही मंत्र्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. अनुराग ठाकूर यांनी कधीही 'गोली मारो...' असे म्हटलेले नाही. ही केवळ त्यांच्या क्रियेवरील प्रतिक्रिया होती. भाजपने कधीही याचे समर्थन केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.