पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तृणमूलच्या कार्यकर्त्याने दिली 'जय श्रीराम'ची घोषणा, सहकाऱ्याने दिला चोप

जखमी रंजीत मंडल

पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने 'जय श्रीराम' म्हटल्यामुळे त्याच्याच सहकाऱ्याने त्याला बेदम मारल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. जय श्रीरामची घोषणा दिल्यामुळेच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जखमी व्यक्तीने केली आहे. बशीरहाट येथे आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मार खालेल्ल्या युवकाचे नाव रंजीत मंडल आहे. 

एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका

पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित रंजीत मंडल हे सहकारी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होते. त्याचवेळी त्याने जय श्रीरामची घोषणा दिली. त्यानंतर संशयित तारक नावाच्या व्यक्तीने शिवी देत त्याला मारहाण केली. 

शेपूट सरळ करण्यास वेळ लागतोच, व्ही के सिंह यांचा पाकला इशारा

जखमी युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांना याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पाकचे १० सैनिकही ठार: लष्कर प्रमुख