पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नो NRC- नो CAA कोणीही बंगाल सोडणार नाही; ममतांचा नवा नारा

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात मंगळवारी मोर्चा काढला होता. कोलकात्यातील स्वामी विवेवकानंद यांच्या प्रतिमेपासून ते गांधी भवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या.

 

 

'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'

या मोर्च्या दरम्यान ममता बॅनर्जी यांनी शपथ घेतली की, 'राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी लागू केले जाणार नाही. त्यांनी पुढे असे सांगितले की, 'नो NRC, नो CAA, कोणीही बंगाल सोडून जाणार नाही. एनआरसी आणि सीएए चालणार नाही. दोन्ही कायदे मागे घ्या, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याला मंत्रिमंडळाची

या मोर्चावेळी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एनआरसीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधाभास वक्तव्य करत आहेत. अखेर खरं कोण सांगत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान, भाजप देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारताची जनता हे होऊ देणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले आहे. 

CAA हिंसक आंदोलनावर ज्वालाने व्यक्त केल्या मनातील भावना