पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'केंद्राच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे तापस पॉल यांचा मृत्यू'

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे माजी खासदार आणि चित्रपट अभिनेते तापस पॉल यांच्या मृत्यूवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तापस पॉल यांच्या मृत्यूला केंद्रीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी तापस पॉल यांना बुधवारी श्रध्दांजली वाहिली. 'तापस पॉल, सुल्तान अहमद यांचा मृत्यू केंद्रीय यंत्रणांद्वारे करण्यात आलेला दबाव आणि केंद्र सरकारच्या सुडबुद्धीच्या राजकारणामुळे झाला.', असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या वृक्ष लागवडीची होणार चौकशी

तापस पॉल यांच्या मृत्यूसंदर्भात बोलताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, 'केंद्र सरकारच्या दबावामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. सुल्तान अहमद, टीएमसी खासदार प्रसून बॅनर्जी यांची पत्नी आणि आता तापस पॉल यांचा मृत्यू झाला आहे.' 

संभाजी भिडेंना बेळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

ममता बॅनर्जी यांनी पुढे असे सांगितले की, 'लोकांना तुरूंगात पाठविले जात आहे. मात्र केंद्रीय यंत्रणांना त्यांचा सहभाग सिद्ध करण्यास किंवा त्यांचा गुन्हा काय आहे हे सिद्ध करण्यात यश आले नाही. जर एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण पॉल आणि इतरांनी कोणता गुन्हा केला हे मला आतापर्यंत माहित पडले नाही.'

अजितदादा आपण उगाच इतकी वर्षे वेगळे राहिलो, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

बंगाली अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तापस पॉल यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. १ फेब्रवारी रोजी मुंबई विमानतळावर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते ६ फेब्रुवारीपासून व्हेंटिलेटरवर होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. 

अट्टल साखळीचोरांवर MPDA अन्वये कारवाई शक्य, मुंबई हायकोर्ट