पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प. बंगालमध्ये CAAविरोधातील आंदोलनात गोळीबार; दोघांचा मृत्यू

आंदोलना दरम्यान गोळीबार

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. आंदोलना दरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केल्याचा आरोप केला जात आहे.

गर्भपातासाठीच्या कालावधीत वाढ, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

दरम्यान, टीएमसीने आरोप केला आहे की आंदोलकांनी गोळीबार केला ज्यामध्ये स्थानिक टीएमसी नेत्याचा भाऊ जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजता घडली आहे. हे आंदोलन भारत बंदचा एक भाग होता. स्थानिक नागरिकांनी सांगितले की हे आंदोलन २० दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेल्या सीएए विरोधी नागरिक मंचाने आयोजित केले होते. 

सलमानवर गोव्यात बंदी घालण्याची काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची

बुधवारी सकाळी टीएमसीचे अध्यक्ष तोहिरुद्दीन मंडल घटनास्थळी आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनीच गोळीबार केला असल्याचा आरोप केला जात आहे. गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. या गोळीबारावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. 

भारत बंद: यवतमाळमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज