पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कर्नाटकमधील आघाडी सरकार वाचेल फक्त वेळ द्यायला हवा'

शिवकुमार

कर्नाटकमध्ये नव्याने निवडणूक होण्याची अजिबात शक्यता नाही. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच तिथे सत्तेवर राहिल. धर्मनिरपेक्ष सरकार वाचविण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, असे राज्यातील मंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या १६ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर तेथील सरकार पेचात सापडले आहे. त्यातच राज्यात आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होते आहे. या पार्श्वभूमीवर 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवकुमार यांनी हे वक्तव्य केले.

'भाजपला दोष देण्यात अर्थ नाही, आपल्या चुका शोधा'

ते म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्षांना काही अधिकार असतात. त्यांची काम करण्याची एक पद्धत असते. आधीच्या राजीनाम्यांबाबत त्यांनी काय निर्णय घेतला आहे, हे आपण बघितलंय. त्याचबरोबर बंडखोरी करून राजीनामे दिलेले आमदारही आपला निर्णय बदलू शकतात. या सर्वाला आता वेळ हेच एकमेव उत्तर आहे. वेळ दिला पाहिजे. यापलीकडे मी काहीच सांगू शकणार नाही.

पिक विम्यासंदर्भात १७ जुलै रोजी शिवसेनेचा मोर्चा

दरम्यान, कर्नाटकमधील परिस्थितीवरून शिवकुमार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपला एवढी कशाची घाई झालीये हेच मला कळत नाही. संपूर्ण देश त्यांच्याकडेच आहे. ३-४ राज्ये सोडली तर अन्य राज्यांतही त्यांचीच सत्ता आहे. मग आता त्यांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते आहे. आम्ही आमच्या बंडखोर आमदारांना समजावण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू. कर्नाटकमधील भाजपचे नेते मुंबईत काय करताहेत, माजी उपमुख्यमंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष बंडखोर आमदारांना भेटायला मुंबईतील हॉटेलात कशासाठी गेले होते, असेही प्रश्न शिवकुमार यांनी विचारले.