पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिनपिंग यांचे चेन्नईत आगमन, मोदींनी केले खास ट्विट

शी जिनपिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या अनौपचारिक चर्चेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नई विमानतळावर आगमन झाले. भारत आणि चीन या दोन्ही देशांतील विविध मुद्द्यांवर या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. महाबलीपूरममध्ये दोन दिवस शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी थांबणार असून, येथील मंदिर आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. एका रिसॉर्टमध्ये या भेटीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पुण्यात रनमशीन बरसली! सचिन, सेहवागचा विक्रम टाकला मागे

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि तेथील उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी विमानतळावर जिनपिंग यांचे स्वागत केले. यावेळी विमानतळावर तामिळनाडूचा सांस्कृतिक वारसा असलेले विविध कार्यक्रम, नृत्यही सादर करण्यात आले. 

महाराष्ट्रात पवारांशिवाय कुणाकडे टॅलेंट नाही का? - अमित शहा

शी जिनपिंग यांचे आगमन होण्यापूर्वी काही तास आधी नरेंद्र मोदी हे सुद्धा चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. तेथून विशेष हेलिकॉप्टरने ते महाबलीपूरमला पोहोचले आहेत. शी जिनपिंग यांचे नरेंद्र मोदी तिथे स्वागत करणार आहेत. शी जिनपिंग चेन्नई विमानतळावर उतरल्यावर काही वेळातच नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करीत त्याचे भारतात स्वागत केले. शी जिनपिंग यांचे आदरातिथ्य करण्याची संधी तामिळनाडूला मिळाल्याचा मला आनंद होतो आहे. या अनौपचारिक भेटीतून दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील याची मला खात्री आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.