पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेतील मार्शल पुन्हा आपल्या जुन्या गणवेशात

राज्यसभेतील मार्शल

गेल्या आठवड्यात राज्यसभेतील मार्शलच्या नव्या गणवेशावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर राज्यसभा सचिवालयाने हा गणवेश मागे घेतला आहे. सोमवारी राज्यसभेतील मार्शल्स पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक बंदगळ्याची सफारी आणि पांढरा फेटा या गणवेशात दिसले.

आता सुप्रीम कोर्टाचे उद्यापर्यंत 'वेट अँड वॉच'

राजसभेच्या २५० व्या सत्रानिमित्त गेल्या सोमवारी मार्शल नव्या गणवेशात दिसले होते. हा गणवेश लष्करी पद्धतीचा होता. त्याला लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना लष्करी पद्धतीचे गणवेश देता येत नाही. ते चुकीचे आहे, असा या अधिकाऱ्यांचा युक्तिवाद होता. माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल वेदप्रकाश मलिक यांनी याला आक्षेप घेतला होता. राज्यसभेत काँग्रेसनेही या गणवेशाला आक्षेप घेतला होता. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गेल्या आठवड्यातच राज्यसभा सचिवालयाला मार्शलच्या गणवेशाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते. 

सत्ता नसेल तर भाजपचे लोक वेडे होतीलः संजय राऊत

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यसभेत मार्शल पुन्हा एकदा जुन्याच गणवेशात दिसले. त्यांनी बंदगळ्याची सफारी आणि डोक्यावर फेटा घातला होता.