चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संसोधन संस्थेतील शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. अंतराळ संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि प्रवास दोन्ही अभिनंदनीय असल्याचे सांगत आजच्या अनुभवातून पुढच्या अंतराळ मोहिमांसाठी आपल्याला मदतच होणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. देश एकदिवस नक्की यशस्वी होईल. आम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
सेहवाग म्हणतो, जर सचिनची कॉपी केली असती तर...
बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयात येऊन नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान २ मोहिमेतील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. मी इथे तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगून नरेंद्र मोदी म्हणाले, शास्त्रज्ञांसाठी प्रयत्न हेच जास्त महत्त्वाचे असतात. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावेच लागते. काहीवेळा अडचणी येतात. पण अडचणीमुळे डगमगून जाण्याचे काहीच कारण नाही. आतापर्यंत इस्रोने देशासाठी केलेले काम लक्षणीय आहे. अनेक नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी इस्रोने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. देशाच्या विकासासाठीही इस्रोचे योगदान अमूल्य आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संपूर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगून नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांच्या कुटुंबियांनाही माझा सलाम असल्याचे सांगितले.
चांद्रयान 2 : अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटला
चांद्रयान २ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा असलेला विक्रम लँडर शनिवारी पहाटे १.५५ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होता. पण चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना त्याचा संपर्क तुटला. अद्याप विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित कऱण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या संदर्भातील माहितीचे विश्लेषण केले जात आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.