पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर पाकिस्तानचे पाणी रोखणार, गडकरींचा इशारा

नितीन गडकरी (Gurpreet Singh / Khanna)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांचे समर्थन करत आहे. पाकिस्तान दहशतवाद रोखू शकत नसेल तर आमच्याकडे त्यांचे पाणी रोखण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी भारताने अभ्यास सुरु केला आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी हरयाणा, पंजाब आणि राजस्थानला वळवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

पंतप्रधानपदासाठी पवारांना विरोध, मायावतींना पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

गडकरी पुढे म्हणाले की, तीन नदींचे पाणी पाकिस्तानला जात आहे. आम्हाला ते रोखायचे नाही. पण, भारत आणि पाकिस्तान दरम्यान जो पाणी वाटप करार झाला होता, तो दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असताना झाला होता. आता ते संबंध संपुष्टात आले आहेत. त्यामुळे त्या कराराचे पालन करणे आमच्यावर बंधनकारक नाही. 

दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये मोदींच्या नावाची घोषणा, FIR दाखल

दरम्यान, याचवर्षी फेब्रुवारीत झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्वांत आधी पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हरड नेशनचा (एमएफएन) दर्जा काढून घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानमधूह आयात होणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कर आकारला होता. त्यानंतर सिंधू जल करारा अंतर्गत तीन नदी रावी, सतलज आणि व्यास येथून पाकला जाणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला होता.