पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑर्बिटरने विक्रम लँडरचे 'लोकेशन ट्रेस' करत टिपले छायाचित्र

ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र टिपले असल्याची माहिती इस्रोने दिली

चांद्रयान २ या भारताच्या ऐतिहासिक मोहिमेबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज असलेल्या विक्रम लँडरचा शनिवारी मध्यरात्री अखेरच्या क्षणाला इस्रोच्या मुख्यालयापासून संपर्क तुटला होता. त्यानंतर विक्रम लँडरचे नक्की काय झाले, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचल्याची माहिती समोर येत आहे. विक्रम लँडरचे लोकेशन समजले असून ऑर्बिटरने त्याचे  छायाचित्र टिपल्याची माहिती इस्रो प्रमुख के सीवन यांनी दिली. अद्याप विक्रम लँडरशी संपर्क झालेला नाही. आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही सीवन यांनी म्हटले आहे. विक्रम लँडरशी पुन्हा सपंर्क होईल, असा विश्वास यापूर्वीच सीवन यांनी व्यक्त केला होता. आम्ही विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील १४ दिवस हे प्रयत्न सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

'पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील आहोत'

भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून चांद्रयान मोहीम ९० ते ९५ टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला होता. विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत आपले काम करत राहणार आहे. त्याच्या माध्यमातून चंद्रावरील छायाचित्रे मिळण्यास मदत होणार असल्याचेही इस्रोने म्हटले होते. 

चांद्रयान 2 : मोहीम ९० ते ९५ टक्के यशस्वी : इस्रो

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:We have found the location of Vikram Lander on lunar surface orbiter has clicked a thermal image of Lander Indian Space Research Organisation ISRO Chief K Sivan