पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० मध्ये आम्ही १२ वेळा बदल केले पण वाद झाला नाही - काँग्रेस

पवन खेरा

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० मध्ये आम्ही एक-दोन नव्हे तर तब्बल १२ वेळा बदल केले आणि हे कलम सौम्य केले. पण त्यावरून कोणताही वाद निर्माण झाला नाही. पण सध्याचे सत्ताधारी असलेले भाजपचे संपूर्ण राजकारणच कायम वादग्रस्त ठरले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली आहे.

मी 'सामना'शिवाय दुसरं वृत्तपत्र वाचत नाहीः संजय राऊत

डेहराडूनमध्ये एका पत्रकार परिषदेत पवन खेरा म्हणाले, या आधी एक किंवा दोन नाही तर तब्बल १२ वेळा काँग्रेस पक्षाने कलम ३७० मध्ये बदल केले. पण त्यावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली होती. त्यामुळे त्यावेळी कोणताही वाद झाला नाही. देशाचा कारभार हा चर्चेतून वाटाघाटीतून करायचा असतो. प्रत्येकवेळी वाद उत्पन्न होईल, असे काम करायचे नसते, असेही त्यांनी सांगितले.

प्रदूषणापासून ताज महालाला वाचविण्यासाठी आता हा उपाय

कलम ३७० रद्द करण्यामागची भाजपची भावना गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. पण ज्या पद्धतीने हे कलम रद्द करण्यात आले ती पद्धत चुकीची आहे, असे सांगून पवन खेरा यांनी सध्या केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केली जात आहे. ती सुद्धा चुकीचीच आहे. यामुळे छोटे व्यावसायिक, उत्पादक आणि शेतकरी देशोधडीला लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला.