पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोरोना'च्या विळख्यातील पाक विद्यार्थ्यांची मदत करु, पण...'

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार

कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या पाक विद्यार्थ्यांची सुटका करण्याबाबत भारत सकारात्मक विचार करत आहे. कोरोना विषाणूने प्रभावित असलेल्या हुबेई प्रांतातून पाकिस्तानी विद्यार्थी मदतीची याचना करत आहेत. यासंदर्भात भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर पाकिस्तान सरकारने यासंदर्भातील कोणता प्रस्ताव मांडला तर भारत सरकार याबाबत निश्चित विचार करेल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.  

J&K च्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात PAS अंतर्गत गुन्हा दाखल

वुहान शहरात अडकलेल्या शेकडो पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे हुबेई प्रांतातून त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. चीनमध्ये अडकलेल्या पाक विद्यार्थ्यांना मतद करण्यासंदर्भात पाकने विनंती केल्यास भारत कोणती भूमिका घेईल? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर त्यांनी भारत सरकार यासंदर्भात सकारात्मक विचार करेल, असे सांगितले.  

'मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी मोदींकडून इतर मुद्द्यांचा वापर'

रविश कुमार म्हणाले की, पाकिस्तान सरकारने आम्हाला यासंदर्भात कोणतीही विनंती केलेली नाही. पण जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर उपलब्ध साधन सामूग्रीचा विचार करुन भारत सरकार  यावर विचार करु शकते. यासाठी काही अटी असतील का? याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. 

एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून ३२३ भारतीय दिल्लीत दाखल

वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने विशेष मोहिम आखली होती. शनिवारी आणि रविवारी मालदीवच्या ७ नागरिकांसह ६५४ लोकांना याठिकाणावरुन बाहेर काढले होते. भारत सरकारच्या या मोहिमेनंतर वुहानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारकडे अशाच प्रकारची मदत मिळावी, याची विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.