मध्य प्रदेश सरकार पाडण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही, असं माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपनं 'ऑपरेशन लोटस'ची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा रंगत आहे, या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आमचा याच्याशी काहीही संबंध नाही असं माध्यमांना सांगितलं
“मध्य प्रदेशातील सध्याचे राजकीय संकट हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही. मध्य प्रदेशात सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात रस नाही हे मी पहिल्या दिवशीच बोललो होतो” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
ईशान्य भारतातील तरुणीला दिल्लीत कोरोना व्हायरस म्हणून हिणवले
ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेदांमुळे सध्या मध्य प्रदेशमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील २० मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, रात्री कमलनाथ यांनी हे राजीनामे स्वीकारले देखील.
Shivraj Singh Chouhan, former #MadhyaPradesh CM: This is Congress' internal matter and I would not like to comment on it. We had said on the first day that we are not interested in bringing down the government. pic.twitter.com/zZUjU2Qc2V
— ANI (@ANI) March 10, 2020
एकीकडे जोतिरादित्य यांच्या समर्थकांनी बंड करत राजीनामे दिले त्यामुळे ते भाजपसोबत जाणार अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत पण सरकार अस्थिर करण्याचे आरोप मात्र भाजप नेत्यांनी फेटाळून लावले आहेत.