पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेन्नईत अनोखी ऑफर, एक किलो इडली पिठावर एक बादली पाणी

चेन्नईत अनोखी ऑफर, एक किलो इडली पिठावर एक बादली पाणी

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये लोकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याअभावी अनेक हॉटेल्स आणि रेस्तराँनी आपला व्यवसाय बंद केला आहे. तर आयटी कंपन्यांनी तर चक्क 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सूट दिली आहे. अत्यंत भीषण संकट चेन्नईवर ओढावले आहे. चेन्नई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका व्यापाऱ्याने मात्र अनोखी शक्कल लढवली असून त्याने एक किलो इडली व डोशाचे पीठ घेतल्यास एक बादली पाणी मोफत देण्याची ऑफर काढली आहे. 

... या शहरातील इमारत बांधकामांवर ५ वर्षे बंदी येण्याची शक्यता

सी. एन. पार्थसारथी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते म्हणाले की, यामागे लोकांच्या अडचणीचा फायदा घेण्याचा हेतू नाही. पाणीटंचाई पाहून ग्राहकांच्या सुविधेसाठी आमच्याच अतिरिक्त कमाईतून खासगी टँकर मागवत आहोत. ते पाणी ग्राहकांना देत आहोत. वडिलांनी लोकांना मदत करण्यासाठी ही सूचना केली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या नागरिकांची मात्र पाण्याची चांगली सोय झाली आहे. 

'आदरपूर्वक वागणूक दिली तरच लक्ष्मीबॉम्बचा पुन्हा विचार करेन'