पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: अर्जुन तेंडुलकरने घेतलेली ही विकेट एकदा पाहाच!

अर्जुन तेंडुलकर

विक्रमादित्य सचिन तेंडुलरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीची चर्चा  चांगलीच रंगली आहे. अर्जुन तेंडुलकर सध्या  इंग्लंडच्या क्रिकेट मैदानात सरेकडून इंग्लंडच्या मैदानात उतरला आहे. इंग्लंडमध्ये लॉर्डसच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने इंग्लिश फलंदाज नॅथन टायलीचा त्रिफळा उडवला.

अर्जुनने घेतलेल्या या विकेटचा व्हिडिओ लॉर्डस क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडिओनंतर क्रिकेट चाहत्यांनी अर्जुनच्या अप्रतिम गोलंदाजीवर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.एमसीसी क्रिकेट संघाकडून गोलंदाजी करताना अर्जुनने ११ षटकात ४.५५ च्या सरासरीने ५० धावा खर्च करुन दोन विकेट्स घेतल्या. यात त्याने दोन निर्धाव षटके देखील टाकली. नो बॉलच्या स्वरुपात त्याने प्रतिस्पर्धी संघाला चार अवंतार धावाही दिल्या.   

डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने भारताच्या १९ वर्षाखालील संघातेही प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने १९ वर्षाखालील गटात कोलंबोच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध आपली पहिली विकेट मिळवली होती.