एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या १५ कोटी मुसलमान १०० कोटींवर भारी पडतील, या वक्तव्यावरील राजकीय वाद अजूनही सुरु आहे. आता महाराष्ट्रातील भाजपचे विधान परिषद सदस्य आणि पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी गुजरातमध्ये जे काही झाले, ते त्यांनी (वारिस पठाण) विसरु नये, असे वक्तव्य केले आहे.
व्यास यांनी मुस्लिम समुदायाला वारिस पठाण यांच्यासारख्या लोकांवर बहिष्कार टाकण्याचा आणि त्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, या देशाचा युवा आणि भाजपचा प्रत्येक युवक वारिस पठाणला त्यांच्याच भाषेत योग्य उत्तर देऊ शकतो.
NRC झाल्यास देशातून ८ कोटी मुसलमान बाहेर जातील- ओवेसी
आम्ही खूप सहिष्णू आणि धैर्यवान आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही याचा सामना करु शकत नाही. गुजरातच्या कालूपूरमध्ये जे झाले होते. ते लक्षात आहे का? जर ते लक्षात ठेवले तर..मला विश्वास हे की मुस्लिम कधीच उठण्याचे साहस करु शकणार नाहीत, असे व्यास म्हणाले.
व्यास यांचा गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मधील दंगलीकडे रोख होता. या दंगलीत सुमारे १००० लोक मारले गेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारिस पठाणविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांना पाकिस्तानला पाठवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट तामिळ रॉकर्सवर लीक
नागपूर येथील व्यास यांनी पठाण यांना आव्हान दिले. ते म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी योग्य व्यवस्था करु. तुम्हाला काय आम्ही बांगड्या घातल्यात असे वाटते का? आम्ही तुमचा सामना करण्यासाठी तयार आहोत. पण समाजात बंधुभाव कायम राहावा, अशी आमची इच्छा आहे.