पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोणी राजकुमार नव्हे पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील'

अभिनेता विवेक ओबेरॉय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींचा निश्चित विजय होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.  

या देशावर जेव्हा जेव्हा कोणी राजकुमारानं राज्य करण्याचा प्रयत्न केला. परदेशी लोकांनी देश लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या जनतेने धडा शिकवला आहे. असा आपल्या देशाचा इतिहास आहे. देशातील सर्व नागरिक आणि चौकीदार आता देश लुटू देणार नाहीत. मोदींचा विजय निश्चित आहे. ते पंतप्रधान आहेत आणि तेच पंतप्रधान राहतील, असे विवेक ओबेरॉयने म्हटले आहे. 'अब भारत लुटेगा नहीं उठेगा' असाही उल्लेख त्याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. 

मोदींवर आधारित चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत दिसणाऱ्या विवेक ओबेरॉयला भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले होते.   लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या चित्रपटामुळे वादही निर्माण झाला होता. या चित्रपटाला अद्याप केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (सीबीएफसी) प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख रखडली आहे. 

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, अद्याप सर्टिफिकेटच नाही