पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, पोलिसांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश

विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून, दिल्ली पोलिसांना कोहलीच्या सुरक्षेत वाढ करण्यात सांगण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला निनावी पत्र आलं आहे, या पत्रात विराट कोहलीचं नाव हिटलिस्टवर असल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे. 

'सेनेकडे पर्याय आहेत मात्र ते स्वीकारण्याचे पाप माथी नको'

दिल्ली पोलिसांतील सुत्रांच्या माहितीनुसार या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सरसंघचालक मोहन भागवत, गृहमंत्री अमित शाह या बड्या लोकांचीही नावं आहेत. 'ऑल इंडिया लष्कर हाय पावर कमिटी कोझीकोड, केरळ' अशा नावानं ही यादी 'एनआयए'कडं पाठवण्यात आली आहे.

बोअरवेलचा आणखी एक बळी, ७५ तासांचे प्रयत्न अयशस्वी

हे निनावी पत्र खोटंही असू शकतं मात्र या यादीतील बड्या लोकांची नावं पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय संघ पुढील महिन्यात सामन्यासाठी बांगलादेशमध्ये जाणार आहे, त्यामुळे भारतीय संघातील खेडाळूंच्या सुरक्षेबाबात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.