चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा किंवा अद्यावत सुरक्षायंत्रणा लावून आपण कितीही काळजी घेतली तरी काही शहाणे चोर चोरी करून कधी पोबारा करतील याचा थांगपत्ताही आपल्याला लागायचा नाही. मात्र कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या जोडप्यानं चोरांना रोखण्यासाठी एक नामी शक्कल योजली आहे, याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल मानलं राव!
दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह
नेमकी काय शक्कल लढवली.
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या कॅटी कॅमेराना आणि तिच्या शेजारचे भुरट्या चोरांपासून हैराण होते. गाडीतील सामान किंवा हाताला जे मिळेल ते घेऊन चोर पसार होत होते. सततची होणारी चोरी रोखण्यासाठी तिनं आणि तिच्या जोडीदारानं नामी शक्कल योजली. त्यांनी घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या गाडीत मोशन अॅक्टीव्हेटेड स्पिंकलर बसवला. म्हणजे स्वयंचलित उच्च दाबाचा पाण्याचा फवारा.
निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार
घराशेजारी एखादा चोर चोरी करायला आला की आत असलेल्या सेन्सॉरमुळे स्पिंकलर आपोआप कामाला लागायचे यातून उच्चदाबानं पाणी समोरच्या व्यक्तीवर फवारायला सुरुवात व्हायची. एक भुरटा चोर यामुळे पळूनही गेल्याचं कॅमेरात कैद झालं. या जोडप्याची सोप्पी पण तितकीच नामी शक्कल सर्वांनाच आवडली.