पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजूनही दिल्लीत हिंसाचार सुरुच, आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू

दिल्ली हिंसाचार

दिल्लीतील बहुतांश हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. मात्र काही भागातील हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी सकाळी शिवविहार भागात जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

इराणच्या उपराष्ट्रीपतींना कोरोनाचा संसर्ग, आतापर्यंत २६ मृत्युमुखी

मृताची ओळख अयूब नावाने झाली आहे. अयबूला शुक्रवारी सकाळी ६ वाजता शिव विहार भागामध्ये काही जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तो बेशुध्द झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. 

पत्नी आणि २ चिमुकल्या मुलांची हत्या करुन युवकाने केली आत्महत्या

दिल्ली हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या ४२ जणांपैकी १२ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. दिलशान गार्डन येथील जीटीबी रुग्णालयात जवळपास २५० जखमींवर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जीटीबी रुग्णालयात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील २८ जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. तर १० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर एलएनजेपी रुग्णालयात ३ आणि चंद्र रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. 

दिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठे होते?; शिवसेनेचा सवाल