पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि बघता बघता गावकरी सव्वा चार लाखांचे कादे घेऊन पसार झाले!

रस्त्यावर पडलेले कांदे घेऊन गावकरी पसार झाले.

झारखंडमध्ये बोकारो रामगढ रस्त्यावर बुधवारी सकाळी कांद्याची पोती असलेल्या पिकअप व्हॅनला अपघात झाला. अपघातात ही व्हॅन पलटी झाल्यामुळे त्यातील कांद्याची पोती रस्त्यावर आली. याची माहिती कळल्यावर कमलापूर आणि आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांनी तिथे जाऊन कांदे उचलण्यास सुरुवात केली. रस्त्यावर पडलेले सर्व कांदे घेऊन गावकरी पसार झाले.

'...या पुढे यु-टर्न हा उद्धव ठाकरे टर्न म्हणून ओळखला जाईल'

गावाजवळ रस्त्यावर कांदे पडले असल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यामुळे हाताला लागेत ती पिशवी, भांडे घेऊन गावकरी रस्त्यावर आले आणि त्यांनी कांदे घेऊन जाण्यास सुरुवात केली. एवढ्या गावकऱ्यांपुढे काहीही करता न आल्याने व्हॅन चालकाने केवळ समोर जे काही सुरू आहे ते बघणेच पसंद केले. अर्ध्या तासात या ठिकाणी पडलेला ३५ क्विंटल कांदा गावकऱ्यांनी उचलून नेला.

आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा VIDEO उ. प्रदेश पोलिसांकडून जारी

व्हॅन चालकाने दिलेल्या माहितीनुसार गाडीत ४.२० लाखांचा कांदा होता. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत गाडीतील आणि रस्त्यावरील सर्व कांदा संपला होता. व्हॅन धनबादवरून रांचीच्या दिशेने चालली होती. त्यावेळी हा अपघात झाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:villagers looted onions worth rupees 4 lakh and 20 thousand know what is the whole matter