पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२६/११ वेळीही विलासराव देशमुखांना मुलाच्या करिअरची चिंता - पियूष गोयल

पियुष गोयल

मुंबईत २६/११चा हल्ला झाला त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे केवळ त्यांच्या मुलाला चित्रपटात भूमिका मिळावी, यासाठी चिंतित होते. यासाठीच ते एका निर्मात्याला घेऊन घटनास्थळी आले होते, असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीचा आता केवळ शेवटचा टप्पा उरला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांविरुद्ध प्रचार करण्याची एकही संधी सोडली जात नाही. पियुष गोयल यांनी लुधियानामध्ये एका व्यावसायिकांच्या बैठकीत बोलताना हा आरोप केला.

दहशतवाद्यांना मारण्यासाठी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी मागायची का?, मोदींचा सवाल

ते म्हणाले, मी सुद्धा मुंबईकर आहे. मुंबईत २६/११ला झालेला दहशतवादी हल्ला तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचे केंद्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार कमकुवत होते. त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख एका निर्मात्याला घेऊन हल्ला झालेल्या पंचतारांकित हॉटेलात आले होते. त्यांना केवळ त्यांच्या मुलाला हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका मिळावी, एवढीच चिंता होती. 

२६/११चा हल्ला झाला, त्यावेळी केंद्र सरकारने प्रत्युत्तर द्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. कारण केंद्रातील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे तत्कालिन सरकार खूप घाबरट होते, असा आरोप त्यांनी केला. आपले लष्कर हे त्यावेळीही शत्रूवर हल्ला करण्यासाठी सक्षम होते. पण निर्णय नेतृत्त्वाने घ्यायचा होता. शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश आपल्याला मिळतील, याची सुरक्षा दलांकडून वाट बघितली जात होती. पण तसे काही घडलेच नाही. कारण ते सरकारच घाबरट होते, असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

... असे बोलणे नरेंद्र मोदींना शोभत नाही - शरद पवार

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा भाजपने महत्त्वाचा मुद्दा बनविला आहे. सर्जिकल आणि एअर स्ट्राईकचे भाजपकडून सातत्याने निवडणुकीत प्रचार करण्यात आला आहे.