पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडरचा शोध घेण्यात नासाचा ऑर्बिटरही तूर्त अपयशी

चांद्रयान २

नासाने चंद्राच्या अभ्यासासाठी पाठविलेल्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याच्या कक्षेत विक्रम लँडर आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नासाच्या ऑर्बिटरच्या माध्यमातून विक्रम लँडरचा फोटो घेणे सहज शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वामी चिन्मयानंद प्रकरण: पीडित तरुणीने दिला आत्महत्येचा इशारा

चंद्राच्या अभ्यासासाठी नासाकडून पाठविण्यात आलेले ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती फिरत आहे. मंगळवारी हे ऑर्बिटर ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरणार होते. त्या ठिकाणाहून पुढे सरकत होते. या संदर्भात नासाच्या प्रवक्ते जोशुआ हंडाल म्हणाले, विक्रम लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरणार होते. तेथील काही फोटो नासाच्या ऑर्बिटरने घेतले आहेत. पण विक्रम लँडर नक्की कुठे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ऑर्बिटरच्या माध्यमातून नेमका फोटो घेता येणार नाही.

सात सप्टेंबर रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. पण लँडिंगच्या काही वेळ आधी विक्रम लँडरचा बंगळुरूमधील इस्रोच्या मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे नक्की काय झाले, याबद्दल विविध तर्क लावण्यात येत आहेत. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता या संपर्कासाठी खूप कमी वेळ शिल्लक राहिला आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

१७ सप्टेंबर रोजी नासाच्या ऑर्बिटरने घेतलेले फोटो आणि आधीचे फोटो याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येईल. त्यामध्ये विक्रम लँडर दिसतो आहे का, हे सुद्धा बघितले जाईल. याचा आढावा आणि विश्लेषण केल्यानंतरच त्याचे निकाल सगळ्यांसाठी जाहीर केले जातील.