पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाजिरवाणे ! हुंड्यासाठी निवृत्त न्यायाधीशाकडून सुनेला मारहाण

हुंड्यासाठी निवृत्त न्यायाधीशाकडून सुनेला मारहाण  (@panditjipranam/Twitter screengrab )

हैदराबाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाने हुंड्यासाठी कुटुंबीयांच्या मदतीने सुनेला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यही सुनेचा छळ करताना दिसत आहे. या निवृत्त न्यायाधीशाचे नाव नुटी राममोहन राव असे असून त्यांच्याविरोधात सून सिंधूने २७ एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पतीसह सासरकडील मंडळी आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा सुनेने आरोप केला होता. दरम्यान, पतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या फोटोसाठी लोक दहा लाख द्यायला तयार!

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात सिंधूचा पती वशिष्ठ तिला सोफासेटवरुन ढकलून देताना दिसतो. ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच नुटी हे ओरडत येत सिंधुला हाताने सोफासेटकडे ढकलून देतात. ते सिंधुला मारतात आणि ओढताना दिसतात. याचदरम्यान, त्यांची मुले त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसतात. सिंधु यांच्या मते, त्यांची सासू दुर्गालक्ष्मी या पाठीमागून सिंधू या वेड्या आहेत त्यांना झोपेच्या गोळ्या देण्याची गरज आहे, असे ओरडत होत्या. या मारहाणीत सिंधुला दुखापत झाल्यानंतर तिला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अहवालानंतर खुलासा

नुटी यांना ही गोष्ट कोणालाच सांगू नको, असा दम भरला होता, असा दावा सिंधूने केला आहे. परंतु, डॉक्टरांना याबाबत सर्व समजले आणि त्यांनी आपल्या अहवाला सर्व दुखापतींचा उल्लेख केला. हा अहवाल पोलिसांना पाठवण्यात आला. त्यामुळे या तक्रारील वजन आले. रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांत याची तक्रार दिली. तिघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ आणि हुंडा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत खटला दाखल करण्यात आली आहे.

विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात, तज्ज्ञांचे मत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Video shows ex Hyderabad high court judge assaulting daughter in law over demands for dowry