पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवू'

वैंकय्या नायडू

भारत कोणत्याही राष्ट्रावर हल्ला करण्यास उत्सुक नाही. पण जर कोणी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देत त्यांना आयुष्यभरासाठी अद्दल घडवू, असे  उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते विशाखापट्टणम येथील नौदलाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी त्यांनी राजनाथ सिंह यांच्या सूरात सूर मिसळत पाकिस्तानसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असे म्हटले. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. आता पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यायला हवा. भारत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देणारे राष्ट्र आहे. पण आमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दांत त्यांनी युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानवर शाब्दिक तोफ डागली. फ्रान्समधील जी ७ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलेल्या चर्चेत काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केले होते. ट्रम्प यांनीही मोदींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक जनतेला संबोधित करताना भारतासोबत युद्ध करण्याची भाषा केली होती.   

इम्रान खान यांच्याकडून अणुबॉम्बची धमकी

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाक व्याप्त काश्मीरसंदर्भात भूमिका मांडली होती. पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरबाबत होईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते.