पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता, नौदल अलर्ट

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता, नौदल अलर्ट

आम्ही सतर्क असून समुद्र मार्गे येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण ताकदीने तयार आहोत, असे भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे. उपनौदलप्रमुख मुरलीधर पवार यांनी तटवर्ती भागातील सुरक्षा वाढवली असून कोणत्याही प्रकारचे दुःसाहस फोल ठरवण्यासाठी कडक पावले उचलत असल्याचे सांगितले.

कलम ३७०: नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

३७० वर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची चरफड

जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा (कलम ३७० अंतर्गत) हटवणे आणि दोन केंद्र शासित प्रदेश (जम्मू-काश्मीर आणि लडाख) केल्यानंतर नौदलाकडून हे वक्तव्य समोर आले आहे. माध्यमांशी बोलताना उपनौदल प्रमुखांनी नौदल दक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. 

भारताची जल, थल, वायू तिन्ही सेना अलर्टवर

शोपियाननंतर डोवाल उतरले अनंतनागच्या ररत्यावर


लष्करातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना भारतात समुद्र मार्गे हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहेत. अशा पद्धतीचे कोणतेही आव्हान प्रभावी पद्धतीने परतवण्यासाठी भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दल अलर्टवर आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Vice Admiral of Indian Navy says Naval Force is ready to destroy any audacity against country amid terror attack threat from Pakistan side