पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णांचे जावई आणि CCDचे मालक सिद्धार्थ बेपत्ता

व्ही जी सिद्धार्थ (MInt file photo)

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई आणि प्रसिद्ध 'कॉफी कॅफे डे' (सीसीडी) या साखळी कॅफेचे मालक व्ही जी सिद्धार्थ सोमवारी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांना अखेरचे सोमवारी रात्री मंगळुरुतील नेत्रावती नदीच्या पुलाजवळ पाहण्यात आले होते. त्यांच्या चालकाने दिलेल्या जबाबावरुन त्यांनी नदीत उडी घेतल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. सिद्धार्थ बेपत्ता झाल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते डी के शिवकुमार, बी एस शंकर यांनी एस एम कृष्णा यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. दरम्यान, सिद्धार्थ यांच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ८ वाजता बंगळुरु येथून मंगळुरु येथे पोहोचले. त्यांना चालकाला उल्लल पुलावर जाण्यास सांगितले. पुलाच्या एक टोकावर कार थांबवून ते उतरले आणि चालत पुढे गेले. जेव्हा दीड तास होऊनही ते न परतल्याने चालकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून सिद्धार्थ यांच्या कॉल डिटेल्सचा तपास केला जात आहे. नदीतही बोटींच्या मदतीने शोध घेतला जात आहे.