पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाबाधित कनिकासोबत पार्टी करणाऱ्या वसुंधरा राजेंसह दुष्यंत सिंहंना धडकी

कनिका कपूरसोबत पार्टीत वसुंधराराजे सहभागी झाल्या होत्या

बॉलिवूडची प्रसिध्द गायिका कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर तिला घरामध्येच विलग करण्यात आले आहे. कनिकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पसरताच तिच्यासोबत पार्टीमध्ये सहभागी झालेल्या भाजपच्या नेत्यांना धडकी भरली आहे. भाजप खासदार अकबर अहमद डम्पी यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कनिका कपूर सहभागी झाली होती. याच पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र भाजपचे खासदार दुष्यंत सिंहसुद्धा उपस्थित होते.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारचा आणखी एक महत्त्वाचा आदेश

वसुंधरा राजे यांनी स्वत: ट्विट करत सांगितले की, 'काही दिवसांपूर्वी दुष्यंत आणि त्याच्या सासरच्या मंडळींसोबत मी लखनऊ येथे आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. गायिका कनिका कपूर जी सध्या कोरोनाबाधित आहे ती सुध्दा या पार्टीत सहभागी झाली होती. सावधानता म्हणून मी आणि दुष्यंतने स्वत:ला विलग केले आहे. आम्ही दोघे सरकारने दिलेल्या आवश्यक त्या निर्देशांचे पालन करत आहोत.'

जनता संचारबंदीमुळे रविवारी दिल्ली मेट्रो सेवा बंद राहणार

महत्वाचे म्हणजे पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपचे खासदार दुष्यंत सिंह अनेकदा लोकसभेतही उपस्थित राहिले होते. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या बैठकी देखील ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील खासदार उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला विलग केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vasundhara raje and bjp mp dushyant joins party with kanika kapoor whos corona virus test positive