पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनर्थ टळला: विद्यार्थ्यांची बस दरीत पडता पडता वाचली

उत्तर प्रदेश बस अपघात

उत्तरप्रदेशमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस १५ फूट खोल दरीत कोसळता कोसळता वाचली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मध्य गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या कच्च्या पुलावर ही बस खचली आणि दरीच्या दिशेने कलंडली. बस दरीमध्ये लटकत असल्यामुळे बसमधील विद्यार्थी घाबरले आणि ते जोरजोरात रडू - ओरडू लागले. मुलांचा आवाज ऐकून शेजारीच शेतामध्ये काम करणाऱ्या गावकऱ्यांनी बसकडे धाव घेतली. त्यांनी बसला दोरीच्या साहाय्याने बांधून तिला दरीत पडण्यापासून वाचवले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य करत सर्व विद्यार्थ्यांंना सुरक्षितरित्या बसच्या बाहेर काढले. 

 ISIचे भारतीय अधिकाऱ्यांच्या WhatsAppवर लक्ष, लष्कराचा सावध राहण्याचा इशारा 

अमरोहा जिल्ह्यातील द आर्यन स्कूल जोया या शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस निघाली होती. असमोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एंचौडा कम्बोह - भलापूर मार्गावर बसला अपघात झाला. नेकपूरजवळील एका कच्च्या पुलावर बस खचली. बस चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात बस दरीच्या बाजूला झुकली. सुदैवाने बस दरीत कोसळता कोसळता वाचली. 

आमचं ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?: उद्धव ठाकरे

बस दरीमध्ये झुकल्यामुळे बसमध्ये असणारे सर्व विद्यार्थी घाबरले. त्यांनी जोर जोरात रडायला आणि ओरडायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आधी त्यांनी बसला रेस्क्यू केले. बसला रस्सी बांधून तिला दरीत पडण्यापासून बचावले. त्यानंतर त्यांनी एक एक करत सर्व विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. बसच्या अपघातामुळे सर्व विद्यार्थी खूप घाबरलेले होते. तर काही विद्यार्थी बेशुद्ध पडले होते. त्यांना पाणी पाजून शुद्धीवर आणण्यात आले. सुदैवाने या अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही.