पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हुंड्यासाठी लग्नानंतर 24 तासात त्याने पत्नीला दिला तलाक

ट्रिपल तलाक

हुंड्यासाठी लालची असणाऱ्या नवऱ्याने लग्नानंतर अवघ्या 12 तासामध्ये पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी फतेहपूर पोलीस ठाण्यात पतीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितले की, हुंड्यामध्ये बाईक न दिल्यामुळे त्यांच्या मुलीला तलाक देण्यात आला आहे. 

चांद्रयान २ : तांत्रिक दोष वेळीच लक्षात आला म्हणून बरे झाले, नाहीतर...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर टांडा गावामध्ये घडली आहे. या गावामध्ये राहणाऱ्या कुतुबुद्दीन यांच्या मुलीचे शनिवारी लग्न झाले. जहांगिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सद्दीपूर गावातील उस्मान गनी यांचा मुलगा शाह आलम याच्यासोबत तिचे लग्न झाले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मुलीचे वडील कुतुबुद्दीन यांनी सांगितले की, रविवारी मुलीच्या सासरच्या मंडळींनी फोन करुन मुलीची तब्बेत ठिक नसल्याची माहिती दिली.  

कुमारस्वामी यांच्या भवितव्याचा फैसला येत्या गुरुवारी

चिंतेत आलेल्या कुतुबुद्दीन यांनी नातेवाईकांसह सुद्दीपूर येथील तिच्या सासरी धाव घेतली. तिथे त्यांची मुलगी खूप घाबरलेल्या अवस्थेत होते. तिने सांगितले की, हुंड्यामध्ये बाईक न दिल्यामुळे पती आणि सासरची मंडळी त्रास देत आहेत. यावरुन कुतुबुद्दीन यांनी जावयाची समजूत काढून त्याची मागणी पूर्ण करेल असे वचन दिले. तेवढ्यात जावयाचे वडील त्यांच्या काही नातेवाईकांसोबत आला. त्याने आलमला त्याच्या पत्नीला ताबडतोब तलाक दे बाकी सर्व पाहून घेऊ असे सांगितेल. यावेळी शाहे आलम याने सगळ्यांच्या समोर पत्नीला तीन वेळा तलाक बोलला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात