पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

योगी सरकारने मशिदीसाठी अयोध्येजवळ दिली ५ एकर जागा

अयोध्या राम मंदिर

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी 'राम मंदिर ट्रस्ट'च्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. त्यानंतर काही तासांमध्येच उत्तर प्रदेश सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. अयोध्येतील धानीपूर येथे सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दिला. 

महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने परस्पर सहमतीने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन द्यावी, असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्याची घोषणा आज केली. 

विनायक मेटेंनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा दिला

उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले की, 'अयोध्या जिल्ह्यातील सोहावल तहसीलमधील धानीपूर गावामध्ये मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जागा देण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय फरिदाबादपासून १८ किलोमीटर तर अयोध्येपासून २५ किलोमीटर  अंतरावर ही जागा आहे. तर लखनऊ- गोरखपूर महामार्गापासून २०० मीटर अंतरावर ही जागा आहे.'

काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करतेय; चंद्रकांत पाटलांचा आरोप

दरम्यान, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'सरकारने मशीदसाठी दिलेल्या जागेच्या निर्णयासाठी २४ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डाची बैठक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर निर्णय दिल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा-हिंद यांनी मशीदसाठी ५ एकर जमीन घेण्यास नकार दिला होता.

महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत: मुख्यमंत्री