पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याण सिंह यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी राजस्थानचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र्य देव सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे सुपुत्र आणि खासदार राजवीर सिंह उपस्थित होते. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने ३७ निर्णयांना दिली मान्यता

८७ वर्षीय कल्याण सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'एवढे वय झाल्यानंतर सुध्दा मी थकलेलो नाही, तसंच माझं मन तुटलेले नाही. मी सरकारसाठी सहकार्य करत राहणार आहे. भाजपला आणखी मजबूत करण्याचे काम मी करत राहणार आहे. मात्र मी निवडणूक लढणार नाही. यापूर्वी मी खूप निवडणुका लढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

भास्कर जाधवही शिवसेनेत, शुक्रवारी औपचारिक प्रवेश

तसंच, 'राजकारण हे जनतेची सेवा करण्याचे सशक्त माध्यम मानले जाते. त्याच भावनेने मी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मी राज्यपाल होतो तोपर्यंत या पदाच्या सन्मानाची मी पूर्ण काळजी घेतली', असल्याचे मत कल्याण सिंह यांनी व्यक्त केले. राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

पाकमधून भारतात आलेल्या २३ नागरिकांना देशाचे नागरिकत्व

त्याचसोबत राम मंदिराच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, 'राम मंदिर बांधणे हा कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सर्व पक्षांनी ते राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे जनतेसमोर येऊन स्पष्ट करावे', असे मत त्यांनी व्यक्त केले. 

'रड्या' म्हणूनच स्मिथ लक्षात राहिल! माजी गोलंदाजाचा बाउन्सर