पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटानंतर इमारत कोसळली; १२ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश सिलेंडर स्फोट

उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सिलेंडर स्फोटानंतर इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. मोहम्मदाबादच्या वलीदपूर गावामध्ये ही घटना घडली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचा समावेश आहे. 

नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे सातच्या सुमारास स्वयंपाक घरात नाश्ता बनवत असताना अचानक सिलेंडचा स्फोट झाला. या स्फोटामुळे दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. जखमींमधील अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी आजमगड येथे हलवण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशमध्ये भीषण कार अपघात; ४ हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले. जखमींना ताबडतोब मदत करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदीचे आदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:uttar pradesh cylinder blast building collapsed many people died rescue operation going on