पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

योगी मंत्रिमंडळ विस्तार: २३ मंत्र्यांनी घेतली शपथ, ५ मंत्र्यांना प्रमोशन

योगी मंत्रिमंडळ विस्तार

योगी आदित्यानाथ यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी पहिला विस्तार झाला. २३ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या व्यतिरिक्त योगी सरकारने ५ मंत्र्यांना पदोन्नोती दिली आहे. डॉ. महेंद्र सिंह, भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर, सुरेश राणा आणि नीलकंठ तिवारी यांना पदोन्नती देण्यात आली. ६ कॅबिनेट मंत्री, ६ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ११ राज्यमंत्री यांनी आज शपथ घेतली. 

निर्मला गावित आणि रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश

योगी मंत्रीमंडळ विस्तारमध्ये ११ नवीन राज्यमंत्री बनले आहेत. अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंद स्वरुप शुक्ला, विजय कश्यप, डॉ. गिर्राज सिंह धर्मेश, लाखन सिंह राजपूत, निलिमा कटियार, चौधरी उदयभान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रमाशंकर सिंह पटेल आणि अजीत सिंह पाल यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

चिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी

तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार सांभाळणाऱ्या सहा मंत्र्यांची कॅबिनेट मंत्री पदी पदोन्नती दिली आहे. यामध्ये ग्राम विकास मंत्री. डॉ. महेंद्र सिंह, मंत्री सुरेश राणा, मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभर यांच्यासह दोन नविन चेहरे राम नरेश अग्निहोत्री, कमला राणी नरुण यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. 

काहीही झालं तरी आम्ही चिदंबरम यांच्या पाठीशीः प्रियांका गांधी

तर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये १८ नविन चेहरे आहेत. यामध्ये कॅबिनेट मंत्री राम नरेश अग्निहोत्री, कमला राणी वरुण हे दोन नविन चेहरे आहेत. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारी यामध्ये कपिल देव अग्रवाल, सतीश द्विवेदी, अशोक कटारिया, श्रीराम चौहान, रवींद्र जयस्वाल यांचा समावेश आहे. तर राज्यमंत्र्यांमध्ये अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंद स्वरूप शुक्ला, विजय कश्यप, डॉ. गिर्राज सिंह धर्मेश, लाखन सिंह राजपूत, नीलिमा कटियार, चौधरी उदयभान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रमाशंकर सिंह पटेल आणि अजीत सिंह पाल हे नविन चेहरे आहेत. 

ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या