पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायदाः लखनऊ-अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

लखनऊमध्ये निर्दशकांनी जाळपोळ केली

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्य़ाविरोधातील (सीएए) आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हीच परिस्थिती अहमदाबादमध्येही दिसून येत आहे. लखनऊमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचर उफाळला आहे. निर्दशकांनी दोन पोलिस चौकीही जाळल्या. त्याचबरोबर बाहेर असलेल्या वाहने पेटवून दिल्या. लखनऊमधील डालीगंज आणि हजरतगंज परिसरातील आंदोलनाने उग्ररुप धारण केले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला, तसेच लाठीमारही केला. पोलिस आणि निर्दशकांमधील चकमकीनंतर येथील इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

अहमदाबाद येथील सरदार बाग परिसरात जमा झालेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे २०० हून अधिक जणांच्या जमावाला पोलिसांनी पांगवले. २० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:uttar pradesh ahmedabad violent protest against citizenship amendment act in many other cities including lucknow