पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्विटर डाऊन, नेटकऱ्यांची तक्रार

ट्विटर

सर्वाधिक वापरली जाणारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ही बुधवारी सकाळी काही तासांपूरता डाऊन झाली असल्याची तक्रार काही युजर्सनं केली आहे. ट्विटरनं आपल्या अधिकृत अकाऊंटवरून  युजर्सच्या तक्रारीनंतर माहिती दिली.  तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील युजर्सनां ट्विट करताना अडचणी येत आहेत. 

वांद्र्याजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरले; हार्बर लोकलसेवा ठप्प

इस्रोतील शास्त्रज्ञांची हैदरबादमध्ये हत्या

ही समस्या निवारण्याचं काम सुरू असल्याची माहिती ट्विटरनं दिली. थोड्याच वेळात सेवा पूर्ववत होईल असंही कंपनीनं सांगत असुविधेसाठी दिलगीर व्यक्त केली आहे. 

नेमका तांत्रिक बिघाड काय झाला हे कंपनीनं स्पष्ट केलं नाही. मात्र ट्विट करताना, व्हिडीओ, फोटो अपलोड करताना युजर्सनां अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण सोडवण्याचं काम सध्या कंपनी करत असून काही वेळात सेवा पूर्ववत होईल असं कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटर डाऊन असल्याच्या जवळपास चार हजारांहून अधिक तक्रारी भारतासह जपान, कॅनडा यांसारख्या देशातील युजर्सकडून ट्विटरकडे आल्या आहेत.