कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान भारत सरकारच्या टि्वटर हँडलवरुन अमेरिकेचे बदलेली भूमिका आता समोर आली आहे. व्हाइट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन समवेत भारताचे एकूण सहा टि्वटर हँडल अचानक अनफॉलो केले आहेत. भारताकडून हायड्रोक्सिक्लोरोक्विन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर १० एप्रिलला व्हाइट हाऊसने भारताच्या या टि्वटर हँडलला फॉलो केले होते.
अष्टपैलू अभिनयासाठी इरफान खान कायम स्मरणात राहतील - मोदी
दरम्यान, अमेरिका इतर कोणत्याही देशांच्या किंवा राष्ट्राध्यक्षांचे टि्वटर हँडल फॉलो करत नाही. परंतु, भारताचे हे हँडल्स अपवाद स्वरुपात फॉलो करण्यात आले होते. परंतु, आता अमेरिकेने पुन्हा आपल्या भूमिकेत बदल केला आहे आणि आता व्हाइट हाऊस अमेरिकेबाहेरील कोणालाही फॉलो करत नाहीये.
5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाची जेव्हा अमेरिकेला गरज होती. तेव्हा भारत सरकारने अमेरिकासह अनेक देशांना हे औषध उपलब्ध करुन दिले होते. त्यानंतर काही दिवसातंच म्हणजे १० एप्रिल रोजी व्हाइट हाऊसने भारत सरकारच्या हे टि्वटर हँडल फॉलो केले होते. व्हाइट हाऊसने फॉलो केलेले पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव बिगर अमेरिकन नेते होते.