पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेचा भारताला दणका, विशेष प्राधान्याचा दर्जा काढला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (AFP FILE)

अमेरिकेने भारताला दिलेला विशेष प्राधान्याचा दर्जा काढला असून याची ५ जूनपासून अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोमाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून याची घोषणा केली आहे. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सूत्रे हाती घेऊन दोनच दिवस झाले आहेत. त्यातच अमेरिकेने ही कार्यवाही केली आहे. दि. ४ मार्च रोजी ट्रम्प यांनी जीएसपी (जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रिफरेन्सेस) कार्यक्रमातून भारताला बाहेर काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ६० दिवसांची नोटीस दिली होती. त्याचा कालावधी ३ मे रोजी संपली. आता यासंबंधी कोणत्याही क्षणी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. 

ट्रम्प यांच्याशी बोलणं फिस्कटलं, उ. कोरियाने राजदुताला दिला मृत्यूदंड

जीएसपी म्हणजेच जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रिफरेन्सेस. अमेरिकेकडून व्यापारात देण्यात येणारी विशेष प्राधान्याची सर्वांत जुनी आणि मोठी प्रणाली आहे. याची सुरुवात १९७६ मध्ये विकसनशील देशांच्या आर्थिक वाढीसाठी केली होती. हा दर्जा प्राप्त असलेल्या देशांना हजारो साहित्य कोणत्याही शुल्काविना अमेरिकेला निर्यात करण्याची सूट मिळते. भारत २०१७ मध्ये जीएसपी कार्यक्रमातील सर्वांत मोठा लाभार्थी राहिला. २०१७ मध्ये भारताने अमेरिकेला ५.७ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. आतापर्यंत सुमारे १२९ देशांना सुमारे ४८०० वस्तूंसाठी जीएसपीचा फायदा मिळाला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

जीएसपीच्या अंतर्गत भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या सुमारे ४०० अब्ज किंमतीच्या वस्तूंवर अमेरिकेत आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. त्यामुळे भारताला १९ ते २० कोटींचा फायदा होत होता. मात्र, अमेरिकेने जीएसपी दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताला आता हा फायदा होणार नाही. भारतीय बाजारात अमेरिकेला न्याय्य व योग्य व्यापारसंधी मिळवून देण्याची हमी भारताकडून मिळत नसल्याने हा निर्णय घेत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

महासत्तांचे व्यापारयुद्ध आणि भारत

दरम्यान, भारताने अमेरिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताने अमेरिकेच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर दिले होते. पण दुर्दैवीरित्या अमेरिकेला ते मान्य झाले नाही, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.