पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तालिबानबरोबर शांतता करार; अमेरिकेने म्हटलं, अफगाणिस्तान सोडणार

तालिबानबरोबर शांतता करार; अमेरिकेने म्हटलं, अफगाणिस्तान सोडणार

अफगाणिस्तानमध्ये शांततेसाठी अमेरिका आणि तालिबान यांच्यात आज (शनिवार) कतारमध्ये ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी झाली. जर तालिबानने शांतता कराराचे पालन केले तर ते १४ महिन्याच्या आत अफगाणिस्तानमधील आपले सर्व सैनिक परत बोलावले जातील अशी घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिका आणि अफगाणिस्तानने आपल्या संयुक्त निवेदनात हे सांगितले आहे. अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमधून हटल्यानंतर तालिबान सशस्त्र लढा सोडणार असल्याचे सांगण्यात येते. या करारावर याच उद्देशाने सहमती झाली आहे. दरम्यान, तालिबानला देशात विदेशी सैनिकांच्या उपस्थितीवर मोठा आक्षेप होता. 

शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

अमेरिका आणि अफगाणिस्तानने संयुक्त घोषणापत्रात म्हटले की, शनिवारी करारावर हस्ताक्षार झाल्यानंतर १३५ दिवसांच्या आत सुरुवातीला अमेरिका आणि त्यांचे सहकारी आपले ८६०० सैनिक परत बोलावतील आणि पुढे १४ महिन्यांत सर्व सैनिक परततील. 

दरम्यान, कतारमधील दोहा येथे शनिवारी कराराच्या स्वाक्षरीचे साक्षीदार बनण्यासाठी ३० देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे विदेश मंत्री आणि प्रतिनिधी पोहोचले होते. दोन्ही पक्षांदरम्यान १८ महिन्यांच्या चर्चेनंतर हा करार झाला. एकीकडे अमेरिकचे विदेश मंत्री माइक पोम्पियो दोहामध्ये हस्ताक्षर प्रक्रियेत सहभागी झाले. तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर आणि नाटो सरचिटणीस जेन्स स्टोलटेनबर्ग शनिवारी काबूलमध्ये उपस्थित होते. 

बिहारमध्ये गंडक नदीत नाव उलटल्याने १३ जण बुडाले

वर्ष २०१६मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच अफगाणिस्तानमधून अमेरिकन फौजा परत घेण्याचे आश्वासन दिले होते. यावरुन त्यांना मोठा पाठिंबाही मिळला होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य ठेवल्यामुळे कोणताच फायदा झाला नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. गेल्या १९ वर्षांपासून जे झाले नाही ते आपण करत असल्याचे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते.